fbpx
हमसे जुड़ें

देव की संस्कृती?

अन्य भाषाएँ

देव की संस्कृती?

कोण मोठ आहे? देव की संस्कृती? जाणून घ्या आपली जीवनशैली(जगण्याचा मार्ग)

भारतात ईश्वराला देव म्हटले जाते, हा शब्द एक प्रकारे भारतीय संस्कृतीचे एक भाग आहे। कधीकधी आपल्यापेक्षा मोठे काय आहे हे ठरवणे आपल्यासाठी अवघड होते – देव किंवा संस्कृती।

पहिल्या दृष्टीक्षेपात असे दिसते की देव महान आहे परंतु जर आपण सखोलपणे पाहिले तर आपणास आढळेल की बहुतेक लोक एका देवावर विश्वास ठेवतात कारण ते एका विशिष्ट समाजात किंवा संस्कृतीत वास्तव्य करतात (राहतात)।

हमसे chat करें

शब्दकोश मध्ये संस्कृतीचे हे वर्णन दिले आहे –

लोकांचे  एक विशिष्ट गट, त्यांची भाषा, धर्म, अन्न, सामाजिक परंपरा, संगीत आणि कला यांचे ज्ञान आणि वैशिष्ट्ये यालाच संस्कृती म्हणतात।

देवावर विश्वास का ठेवावा?

आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की बहुतेक लोकांना तर हे पण माहित नसते कि ते  देवावर विश्वास का ठेवतात। बरेच लोक ह्या गोष्टीनी निराश झाले आहेत की धार्मिक लोकांना देवाकडून काहीतरी मिळवायचे असते। त्यांना हि भीती असते की जर त्यांनी विश्वास ठेवला नाही किंवा काही विधी, पूजा किंवा यज्ञ केले नाही तर त्यांच्या संगे काहीतरी वाईट घडेल। ते भीतीमुळे विश्वास ठेवतात।

भारतीय सभ्यता आणि संस्कृतीत असे अनेक गैरसमज अनेक वर्षांपासून चालले आहेत ज्यामुळे तरुणांना वाटते की देव हा मनुष्याने बनवलेला नियम आहे आणि त्याचे पालन करणे हे त्यांचे कर्तव्य आहे। परंतु जर आपण खरोखरच देवाचा शोध घेत असाल तर आपल्याला आढळेल की मानव जातीने संस्कृती निर्माण केली आहे। पण जग आणि माणूस ह्याची निर्मिती देवने केली आहे।

जगात सुमारे १९५ देश आहेत आणि त्यांच्या स्वत: च्या भाषा आणि त्यांचा स्वत: च्या संस्कृती आहेत। नकळत, आपल्या संस्कृतीत, देवा बद्दलची अशी श्रद्धा बनली आहे की ज्या गोष्टी आपण आपल्या क्षमतेने प्राप्त करू शकत नाही त्या मिळवण्या करिता देव हे एक साधन आहे। म्हणून जर आपण हे चांगले कार्य केले किंवा देवाच्या नावाने एखाद्याला मदत केली, किंवा काहीतरी नेविदय ठेवलं, किंवा काहीतरी अर्पण केल किंवा मजीद मध्यें चादर चढवली तरच आपली इच्छा पूर्ण होईल।

या व्यवहाराचे नाते पाहून बरेच तरुण नास्तिकते कडे झुकले आहेत।

तर संस्कृती पूर्णपणे चुकीची आहे का?

नक्कीच नाही! संस्कृती पूर्णपणे चुकीची नाही, परंतु ती मानव निर्मित असल्यामुळे, त्यात त्रुटी आहेत। जस भारतातील बर्‍याच समाजात मुलगी जन्माला येताच मारून टाकतात, त्याचप्रमाणे बालविवाह ही एक वाईट संस्कृती आहे, हुंडा देखील चुकीच्या संस्कृतीचे भाग आहे। खरं तर, मानवांनी बनवलेल्या कोणत्याही गोष्टी मध्ये एक त्रुटी/दोष आहे आणि संस्कृती देखील याला अपवाद नाही।

आपल्याला कोणी बनवले? आमचा देव कोण आहे?

मग काय कोणी देव आहे कि नाही? आणि संस्कृती हीच सर्वात मोठी आहे का? थोर भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांनी एका शालेय मुलीच्या पत्राला उत्तर म्हणून असे लिहिले होते कि –

जे  लोक खरोखरच विज्ञानाचे गांभीर्याने अभ्यास करतात त्यांना लवकरच कळते की ब्राह्मणाच्या नियमांत एक आत्मा (शक्ती) जरूर आहे जी मनुष्यापेक्षा पण अधिक प्रभावी किंवा कार्यक्षम आहे, म्हणून विज्ञानाचा शोध आपल्याला एका विशेष अध्यात्माकडे घेऊन जातो जो एक अननुभवी व्यक्तीच्या धार्मिकते पेक्षा अगदी वेगळा आहे।

मित्रांनो, शास्त्रज्ञांचा एक मोठा वर्ग आहे जो असा विश्वास करतो की जगाचा निर्माता आहे। माझा असा विश्वास आहे की तो रचनाकार एक जिवंत देव आहे आणि आपण त्याला ईश्वर किंवा देव म्हणतो।

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हि आहे कि हा देव कोणत्याही गटात, देशात किंवा संस्कृतीत फरक करत नाही। याच परमेश्वर ने जगातील सर्व काही निर्माण केले आहे। तो प्रत्येक संस्कृती पेक्षा श्रेष्ठ आहे।

बायबल मध्ये लिहिले आहे –

त्याने पृथ्वीवर राहण्यासाठी एकाच मनुष्यापासून सर्व वंश निर्माण केले आहे आणि त्यांना नेमलेल्या काळाची सीमा बांधून दिली आणि तिथे ते राहावे जेणेकरुन त्यांना देव सापडेल, कदाचित त्याला शोधून सापडेल, तरीही तो (देव) आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही। (प्रेषितांची कृत्ये १७: २६-२७) – सामाजिक लोक

मित्रांनो या देवाला अधिक ओळखा। तो तुमचा निर्माता आहे आणि त्याला तुमच्या जातीशी किंवा संस्कृतीची काही पर्वा/फरक नाही। तो आपल्याला अनंत काळचे जीवन आणि क्षमा देऊ इच्छितो।

हमसे chat करें

To Top