fbpx
हमसे जुड़ें

प्रार्थना करण्याचे टिप्स जे आपले जीवन बदलू शकतात

अन्य भाषाएँ

प्रार्थना करण्याचे टिप्स जे आपले जीवन बदलू शकतात

प्रार्थना काय असते? मी प्रार्थना कशी करू? प्रार्थना केल्याने काही मिळते की मनाला फक्त दिलासा मिळतो? काय प्रार्थना केल्याने खरोखर च सुख भेटते? मी प्रार्थना कशी करू आणि कोण आहे जो माझी प्रार्थना ऐकतो आणि माझ्या प्रार्थनांचे उत्तर देऊ शकतो?

 मनात सुख असण

“हृदयात सुख आहे कारण प्रार्थना आहे ” प्रत्येकजण त्या देवाचे नाव घेतो आणि त्याचा  हात आपल्यावर हवा आसतो। म्हणूनच आम्ही त्याच्या कडे प्रार्थना करतो की देवाचे आशीर्वाद त्याच्या लोकांवर असो, तो रक्षण करील, आनंद आणील, वाईट डोळ्यांपासून वाचवेल, वाईट गोष्टी व्यवस्थित करेल।

हमसे chat करें

प्रार्थना कश्या प्रकारे करावी?

प्रार्थना करणे कठीण नाही आहे, कधीकधी आपण विचार करतो कि आपल्या प्रार्थना ऐकल्या आहेत की नाही त्यामुळे आपण गोंधळात असतो। वेगवेगळ्या विषयांसाठी कशी आणि कश्या प्रकारे प्रार्थना करावी? आम्हाला बर्‍याच वेळा माहित नसत सुरक्षिततेसाठी प्रार्थना कशी करावी आणि बरे होण्यासाठी/ चांगाई साठी प्रार्थना कशी करावी।

प्रार्थनेत मदतीसाठी काही टिपा –

1. साधी आणि सोपी प्रार्थना – आम्हाला वाटते की देवा कडे प्रार्थना करण्यासाठी खूप भावनिक असणे आवश्यक आहे, मोठे शब्द वापरण्याची आवश्यकता आहे परंतु प्रत्यक्षात देव आपली छोटी प्रार्थना, आपले तुटलेले शब्द, आपले अश्रू ऐकतो।

प्रार्थना – देवाशी बोलने आहे आणि जेव्हा आपण एखाद्याशी बोलतो तेव्हा आपण आपल्या मनात जे असत तेच बोलतो, त्याचप्रकारे, आपण देखील आपली विनंती परमेश्वरासमोर ठेवली पाहिजे ज्याप्रमाणे आपण एखाद्या मित्राशी बोलतो। अश्या प्रकारे प्रार्थना करण्यास काही अडचण नाही येणार आणि सहज प्रार्थना करू शकाल।

२. चुकीच्या प्रार्थना- जर आपण प्रार्थना करीत असाल की आपण परीक्षा उत्तीर्ण व्हावे आणि आपला मित्र अपयशी हो, आपल्या ला ऑफिसमध्ये पदोन्नती मिळावी आणि आपल्या उर्वरित सहकाऱ्याच वाईट हो, आपल्या मुलीचे लग्न हो आणि आपल्या शेजार्‍याची मुलगी कुमारी बसून राहू दे अश्या प्रार्थना करण्यात काही उपयोग नाही। तो देव आहे कुठलाही चिरागचा जीन नाही कि तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करेल। तो मानवी मन आणि त्याचे विचार जाणतो आणि त्याची परीक्षा घेतो। देव तुमच्या ह्या प्रार्थना ऐकतो पण तो नक्कीच त्या पूर्ण करणार नाही। म्हणून पश्चात्ताप करा आणि त्या चुकीच्या प्रार्थनांसाठी पापांची क्षमा मागा  कारण तो पापांची क्षमा करण्यास विश्वासू देव आहे।

3. संकटातून बचावासाठी प्रार्थना – जर आपण संकटात सापडले असाल आणि काय प्रार्थना करावी हे माहित नसेल तर आपण प्रार्थना करू शकता की येशू ख्रिस्त मला या संकटातून वाचवा अशी विनंति करतो/करते, मी तुझ्या पवित्र रक्ताने स्वत: ला लपवतो/लपवते आणि विश्वास करतो की या संकटाच्या वेळी तुझे रक्त माझे रक्षण करेल। या परिस्थितीच्या दरम्यान, तुझे देवदूत माझे रक्षण करतील आणि या संकटाला तुझ्या महिमे मधेय बदलून टाक. येशू ख्रिस्ताच्या नावे आमीन।

4. उपचारांसाठी प्रार्थना – येशू ख्रिस्तात माझा विश्वास आहे की “तुझे रक्त सांडल्यामुळे माझे पाप क्षमा झाले आहे, तुज्या कोडे खाल्याने मला बरे केले/चांगाई दिली आहे, आणि तुम्ही छळ सहन केल्याने मला शांती मिळाली आहे।” मी वधस्तंभावर माझे पाप, रोग, शाप क्रुसावर लटकलेले पाहतो/पाहते। माझी चंगाई जी तु वधस्तंभावर मरून मला भेटली आहे ते मी ग्रहण करते/ करतो आणि माझ्या आयुष्यात त्याची घोषणा करते/करतो।

मी तुझे आभार करते/ करतो कि तुम्ही माज्या प्रार्थना चे शब्द ऐकले त्यानुसार कृति केली। येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन।

5. आशीर्वाद मिळण्यासाठी प्रार्थना – लक्षात ठेवा की देव तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्या जीवनात प्रत्येक चांगला आशीर्वाद येण्याची एक निश्चित वेळ आहे। म्हणून आपण प्रार्थना करू शकता की येशू ख्रिस्त मी तुमच्यावर विश्वास करते/करतो की तुम्ही माझ्या आयुष्यात स्वर्गातून भल्या आणि चांगल्या गोष्टी माझ्याकडे पाठवाल। मी तुझ्या प्रेमाला ग्रहण करते/करतो आणि ते आशीर्वाद तुज्या नावावर विश्वास ठेवून मला मिळाल आहे।

6. भूत प्रेत पासून मुक्तीसाठी प्रार्थना – येशू ख्रिस्त, मी तुमचे आभार मानतो/मानते की तू वधस्तंभावर मेल्याने, मौल्यवान रक्त सांडल्यामुळे आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठून पाप, मृत्यू, सैतानाला हरवलंस, म्हणहून मी येशू ख्रिस्तच्या नावे या दुष्ट आत्म्यास ओरडते/ओरडतो आणि ह्या जागेतून, या मनुष्य तुन निघून जाण्याची आज्ञा देत आहे। आणि पवित्र आत्मा मी तुला विनंति करतो की तू मला भेटायला आलास, कारण तुझ्या वचना प्रमाणेच मी तुज्या आत्माच मंदिर आहे, म्हणून ह्या मंदिरास तुज्या उपस्तिती ने भरून टाक। मी स्वत: ला, माझ्या कुटुंबास, माझे घर तुझ्या पवित्र रक्तामध्ये लपवून ठेवत आहे आणि विनंति करतो की तुझे पवित्र दूत माझे आणि माझ्या कुटुंबाचे रक्षण करतील आणि माझ्या अवती भोवती त्या वाईट आत्म्यास भटकून देणार नाही। माझी प्रार्थना ऐकल्या बद्दल धन्यवाद येशू ख्रिस्ताच्या नावे आमेन।

या प्रार्थनेसमवेत तुम्ही बायबलची मदत घेऊ शकता, त्यामधून देवाचे वचन वाचू शकता आणि तुम्हाला अधिक माहिती हवी असेल किंवा एखाद्या विषयात मदत हवी असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता। देव तुम्हाला आशीर्वाद देईल।

हमसे chat करें
To Top