fbpx
हमसे जुड़ें

माझे अस्तित्व आणि माझी ओळख काय आहे?

अन्य भाषाएँ

माझे अस्तित्व आणि माझी ओळख काय आहे?

अस्तित्वाची व्याख्या

माझ्या कॉलेज किंवा ऑफिसचे आय कार्ड (ओळखपत्र) नुसार मी एक विद्यार्थी किंवा अधिकारी आहे। माझ्या मतदार आय। कार्ड (मतदार ओळखपत्र) नुसार मी भारताचा एक नागरिक आहे। माझ्या कुटुंबात मी एखाद्याचा मुलगा / मुलगी, भाऊ / बहीण किंवा माझ्या मित्रांन  मध्ये त्यांचा मित्र आहे।

या सर्व गोष्टींवरून हे स्पष्ट आहे की माझी ओळख वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी-वेगळी आहे। माझी ओळख माझे काम किंवा माझ्या आसपासच्या वातावरणानुसार माझी ओळख वेगळी-वेगळी आहे। पण मी अनाथ असेल तर काय? माझ्याकडे कोणतेही  कुटुंब नाही किंवा मी कोठेही अभ्यास (शिक्षण ) किंवा नोकरी करत नाही किंवा माझ्याकडे कोणतेही आय-कार्ड (ओळखपत्र ) नाही तर माझी काहीच ओळख नाही का?

बरेच लोक त्यांची ओळख अनेक प्रकारे पाहतात।

हमसे chat करें

आपली खरी ओळख वास्तविकतेने आपल्या जीवनातील उद्देशाशी जोडली आहे। चला ते समजून घेऊया।

समजा माझ्याकडे एक फोन आहे. मी तो फोन कॉल, संदेश, व्हॉट्सआप, फेसबुक, गाणी ऐकण्यासाठी किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी वापरु शकतो। त्या फोनची ओळख म्हणजे कंपनीचे नाव आहे जिथे फोन तयार करतात किंवा उत्पादित करतात। त्या फोनचा उद्देश लोकांना कॉल करणे आहे. त्या कंपनीने हा फोन मूळतःच  लोकांना कॉल करण्यासाठी बनवला आहे. कदाचित तो संदेश पाठवू शकेल परंतु तो पेजर नाही, जरी आपण त्यातुन गाणे ऐकू शकतो परंतु ते एमपी 3 प्लेयर नाही आहे …
फक्त देवच आपल्याला आपली ओळख आणि आपल्या जीवनाचा उद्देश सांगू शकतो, ज्याने आम्हाला निर्माण केले आहे। बायबलमध्ये आपल्याला हे भेटेल कारण हे देवाचे वचन आहे. आपण देव, त्याचे अस्तित्व आणि बायबल बद्दल पुढील चर्चा करू।

अंतिम अस्तित्व काय आहे? त्याची व्याख्या काय आहे?

अस्तित्व म्हणजे कोणती वस्तू असण्याचे भाव आहे. कोणतीही वस्तू, व्यक्ती किंवा ठिकाण असण्याचे अस्तित्व किंवा पुराव्यानेच आपल्याला त्याचे अस्तित्व कळते।

तर देव आहे काय?

समजा वाटेत तुम्हाला एखादी पेंटिंग (चित्रकारी)  सापडली. आपल्या मनात पहिली गोष्ट येईल की हे चित्र कोणी बनवले? कारण चित्र असेल तर त्याचा चित्रकार पण असेल! तर होय, अर्थातच असणार … बायबल म्हणते की देवाच अस्तित्त्वात आहे, त्याने हे संपूर्ण जग आणि त्यातील प्रत्येक सजीव प्राणी आणि सर्व ब्रहाण्ड  निर्माण केले। त्यानेच आम्हाला जीवन दिले, आम्हाला त्याची मुले असल्याची ओळख दिली आणि आपल्या स्वतःच्या जीवनाचे ध्येय दिले आणि ते हे आहे कि आपण त्याला ओळखू शकतो। त्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त आमच्यासाठी पाठविला यासाठी की त्याच्या द्वारे आम्हाला देव मिळावा।

 वैज्ञानिक देवावर विश्वास ठेवतात का?

आज, एकविसाव्या शतकाच्या उत्तर-आधुनिक काळात लोक बहुतेकदा असा विश्वास करतात की वैज्ञानिक देवावर विश्वास ठेवतच नाहीत आणि विज्ञान आणि देव यांच्यात काही संबंध नाही। तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगाला ‘3 लॉज ऑफ मोशन’ देणारे  महान वैज्ञानिक आयझॅक न्यूटनचा देवावर विश्वास होता। विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणाले, “मला खात्री आहे की देव जुगार खेळत नाही”। यावरुन ते सांगत होते की देव अस्तित्वात आहे आणि आपल्या दृष्टी नुसार जगात सर्व काही करतो। सायंटिफिक ब्लेझ पास्कल, ज्याच्या नावा वर ‘प्रेशर’ म्हणजे ‘दाब’ चे एस.आय. युनिट म्हणजे  ‘पास्कल’ पडलं, त्यांनी तर इतके पर्यंत सांगितलं की प्रत्येक मनुष्याच्या अंत: करणात रिक्त स्थान आहे, जे देवाचे प्रेम आहे आणि फक्त ते येशू ख्रिस्तालाच भरता येते।

तर देव सत्य आहे का?

होय … आणि हि गोष्ट प्रकाश किंवा ज्योती सारखी सामान्य आहे, जे स्वतः आपल्यास (दृश्यमान) दिसत नाही, परंतु ज्यामुळे आपण जगातील सर्व गोष्टी पाहू शकतो।

आपली ओळख आणि आपले अस्तित्व देवा बरोबर जोडलेले आहे हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे। देवा शिवाय आपली ओळख अपूर्ण आहे आणि आपल्या अस्तित्वाला कोणतेही उद्दीष्ट नाही।

आपणास ओळख, अस्तित्व आणि देवा बद्दल काही प्रश्न किंवा शंका असल्यास आपण आमच्याशी संपर्क करू शकतात।

हमसे chat करें
To Top