fbpx
हमसे जुड़ें

मी देवावर विश्वास का ठेवला पाहिजे?

अन्य भाषाएँ

मी देवावर विश्वास का ठेवला पाहिजे?

देवा वर विश्वास: वास्तविकता किंवा फक्त एक कल्पनारम्य?

देव, ईश्वर, अल्लाह आदी  शब्द आमच्यासाठी कधी- कधी एक अशी गोष्ट होते कि ज्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो। पुस्तके, कथा आणि उपाख्यान मधेच देव हा शब्द चांगल दिसतो पण वास्तविक जीवनात हे सर्व काल्पनिक च दिसते. बर्‍याच लोकांचा हा प्रश्न बरोबर आहे कि मी देवा वर विश्वास का ठेवू?

जगातील 7% लोक नास्तिक आहेत। हे असे लोक आहेत जे देवा वर विश्वास ठेवत च  नाही किंवा कोणत्याही अलौकिक शक्तीवर पण विश्वास ठेवत  नाहीत। आजच्या जीवनशैली माध्ये हि सामान्य गोष्ट आहे। आजचा तरुण देवा वर विश्वास ठेवू नका ही फॅशन मानतात। नास्तिक असणं  कुठेना – कुठे आपल्या स्वतः मध्ये एक  “मस्त” (कूल ) गोष्ट वाटत आहे। परंतु जर काही तरी सत्य असेल किंवा काहीतरी अस्तित्त्वात असेल तर ते नाकारणे हे मूर्ख पणाचे आहे।

हमसे chat करें

मग मी देवावर विश्वास का ठेवू नये?

चला तर आपण असे काही कारण पाहुया आणि समजून घेऊया जे आपणास  देवा वर विश्वास ठेवण्यास मदत करणार आसेल। पहा देव असल्याचा पुरावा म्हणजे त्याच्या अस्तित्वाचा पुरावा आहे।

1. या सृष्टिची  सुरूवात कोणीतरी याला निर्माण केल आसेल याचा पुरावा आहे। प्रत्येक वस्तूच्या अस्तित्वा मागील तत्वज्ञान किंवा मानसशास्त्रा नुसार काही-ना-काही कारण आहे। या निर्मिती च्या सुरूवातीचे पण एक कारण आहे आणि तो स्वत: देव आहे। त्यानेच हे जग निर्माण केले आहे।

2. आपल्या पृथ्वीच्या रचनेतील गुंतागुंत सूचित करते की देवाने केवळ या पृथ्वीची निर्मितीच केली नाही तर त्याला चालवत पण आहे। पृथ्वी वर हवा, पाणी आणि सर्व घटक किंवा प्रकरण, आपल्या- आपल्या जागी योग्य त्यांच प्रमाण आहे, जसे कि झाडे-वनस्पती, जीव-जन्तु, इतपत कि आपण मनुष्य देखील पृथ्वी सोडून कोठेही नाही राहू शकत।

3. हि सृष्टि पण निसर्गाच्या बनवलेल्या कायदे नुसार चालते, उध्दहारनार्थ    गुरुत्वाकर्षणचा नियम कोणतेही दोन वस्तू एकमेकांना आकर्षित करून एकमेका जवळ खेचतात (आकर्षित करतात )। या सारखे निसर्गाचे असे बरेच कायदे आहेत जे या जगाला चालवतात आणि हे या गोष्टीचा पुरावा आहे कि या नियमाला निर्धारित करणारा कोणीतरी उपस्थित आहे।

4. आपल्या शरीराच्या पेशी किंवा कोशिका मध्ये उपस्थित डी.एन.ए. कोड आपल्या शरीराचा रंग-रूप, लांबी, आकार, आपली वागनुक, इत्यादी निश्चित करतात। हे स्पष्ट करतात की आपले शरीर संगणक प्रोग्राम द्वारे संगणका सारखे प्रोग्राम केलेले आहे। तो प्रोग्रामर दुसरा कोणी ही नासून तो देव आहे।

5. देव आपल्याला शोधत आहे, तो आपल्याला  स्वत: कडे बोलवत आहे  त्याने आपल्या उपस्थितीची छाप आपल्या साठी सर्वत्र सोडली आहे जेणे करून आपण त्याच्या पर्यंत पोहोचू शकू। निसर्गाच्या सौंदर्यात त्याच्या अमर्यादित सौंदर्याची झलक आणि लोकांशी असलेल्या आपल्या नात्यांवरील प्रेम त्यात त्याच असीम प्रेम दडलेलं आहे।

6. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या मध्ये आपल्याला देवाची सर्व वैशिष्ट्ये आढळतात। येशू ख्रिस्त देव आहे। येशू ख्रिस्त हे काल्पनिक पात्र नाही तर मानवी इतिहासाचे एकमेव अस नाव आहे ज्याने आपल्याला देवा चे खरे रूप दर्शविले आहे. बायबल नुसार तो 100 टक्के मनुष्य आणि 100 टक्के देव आहे।

अद्यापहि आपणस देवा वर किंवा परमेश्वरा वर विश्वास ठेवण्याचे कोणतेही ठोस कारण भेटले नसेल तर मग आपण स्वतः येशू ख्रिस्त बद्धल जाणून घेण्याचा प्रयत्न का करू नये? याविषयी अधिक बोलण्या साठी आपण आमच्याशी संपर्क साधू शकतात। काय माहिती येशू ख्रिस्ताला ओळखण्या द्वारे आपल्याला देवा वर विश्वास ठेवण्याचे कारण पण भेटेल??? 

हमसे chat करें
To Top