अन्य भाषाएँ
मी देवावर विश्वास का ठेवावा?: देव कोण आहे? Who is GOD?
काय खरोखर देवावर विश्वास ठेवला जाऊ शकतो का? जर देव सत्य असेल तर त्याच्या अस्तित्वाचे सत्य देखील असलेच पाहिजे। काय हि केवळ काल्पनिक आणि धार्मिक गोष्टी तर नाही?
देवावर विश्वास: वास्तवीकता किंवा फक्त एक कल्पनारम्य?
देव, ईश्वर, अल्लाह इत्यादी शब्द कधीकधी आपल्यासाठी अशी गोष्ट बनतात की आपण केवळ कल्पनाच करू शकतो. आम्हाला फक्त देव, हा शब्द पुस्तके, गोष्टी आणि किस्से/ पूर्वघटना यात आवडतो, परंतु वास्तविक जीवनात ते सर्व काल्पनिक वाटते. बर्याच लोकांचा प्रश्न बरोबर आहे कि, मी देवावर विश्वास का ठेवू?
जगातील किमान 7% लोक नास्तिक आहेत। हे असे लोक आहेत जे देवावर विश्वास ठेवत नाहीत किंवा कोणत्याही अलौकिक शक्तीवर विश्वास ठेवत नाहीत। आजच्या जगात ते सामान्य आहे। आज काल चे तरुण देवावर विश्वास ठेवू नका ही फॅशन मानतात। नास्तिक असणं ही कुठे-ना-कुठे स्वतःमध्ये एक ‘कूल’ गोष्ट त्याना वाटत आहे। परंतु जर काहीतरी सत्य असेल किंवा काहीतरी अस्तित्वात असेल तर ते नाकारणे हे मूर्खपणाचे आहे।
मग मी देवावर विश्वास का ठेवू नये?
का नाही आपण काही कारणे पाहू आणि समजू जे देवावर विश्वास ठेवण्यास मदत करतील? पहा देव असल्याचा पुरावा म्हणजेच त्याचे अस्तित्व असल्याचा पुरावा आहे।
1. या सृष्टिची सुरूवात ही कोणीतरी तयार केली असेलेच याचा पुरावा आहे। तत्वज्ञान किंवा फिलोसोफी नुसार प्रत्येक गोष्टीच्या अस्तित्वामागे काही-ना-काही कारण असते। या सृष्टिच्या सुरूवातीचे पण एक कारण आहे आणि ते स्वत: देव आहे। त्यानेच ही सृष्टी बनवली आहे।
2.. आपल्या पृथ्वीच्या रचनेतील काम्प्लेक्सिटी किंवा गुंतागुंत आहे जे सूचित करते की देवाने केवळ या पृथ्वीची निर्मिती केली नाही तर ती चालवत पण आहे. पृथ्वी वरील हवा, पाणी आणि पृथ्वीवरील सर्व घटक किंवा पदार्थ त्यांच्या योग्य ठिकाणी अशा प्रकारे आहेत की झाड-रोपटं, जीव-जन्तु,इतपत मानव देखील या पृथ्वीवरच जगू शकतो आणि इतर कोठेही नाही।
3. ही सृष्टी निसर्गाच्या काही तयार-निर्मित कायद्यानुसार कार्य करते, जसे कि ग्रैविटी किंवा गुरुत्वाकर्षणाचे कायद्या ज्यानुसार कोणत्याही दोन वस्तू एकमेकांना आकर्षित करतात। आणि निसर्गाचे असे बरेच कायदे आहेत जे या जगाला चालवतात आणि हे याचा पुरावा आहे कि या नियमाला निर्धारित करणारा कोणीतरी आहे।
4. आपल्या शरीराच्या पेशी किंवा कोशिकामध्ये डीएनए कोड आपल्या शरीराचे रंग-रूप, लांबी, आकार, आपलं वर्तन इ. निश्चित करते। हे स्पष्ट करते की आपले शरीर संगणक प्रोग्रामर द्वारे संगणकासारखे प्रोग्राम केलेले आहे। तो प्रोग्रामर दुसरा कोणीही नाही तर देव आहे।
5. देव आपल्याला शोधतो, आपल्याला त्याच्या कडे बोलावतो। त्याने त्याची उपस्थितीची छाप आपल्या साठी सर्वत्र सोडली आहे जेणेकरून आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकू। निसर्गाच्या सौंदर्यात त्याच्या असीम सौंदर्याची झलक आणि लोकांशी असलेल्या आपल्या नात्यांतील प्रेम त्याच्या असीम प्रेमामध्ये दडलेल आहे।
6. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या मध्ये आपल्याला देवाच्या सर्व गुणांची चिन्हे आढळतात। येशू ख्रिस्त देवाचे स्वरूप आहे। येशू ख्रिस्त हे काल्पनिक पात्र नाही, परंतु मानवी इतिहासाचे एकमेव नाव आहे ज्याने आपल्याला देवाचे खरे रूप दर्शविले आहे। बायबलनुसार तो 100 टक्के मनुष्य आणि 100 टक्के देव आहे।
जर आपण अद्याप देव किंवा देवावर विश्वास ठेवण्याचे कोणतेही ठोस कारण पाहिले नाही तर मग आपण स्वतः येशू ख्रिस्तस जाणून घेण्याचा प्रयत्न का करू नये? याविषयी अधिक बोलण्यासाठी आपण आमच्याशी संपर्क साधू शकता। काय माहित येशू ख्रिस्ताला ओळखण्या द्वारे आपल्याला देवावर विश्वास ठेवण्याचे कारण भेटू शकते?