fbpx
हमसे जुड़ें

मी देवा कडे माझ्या पापांची क्षमा भेटण्यासाठी कसे मांगू ? जाणून घ्या पापातून मुक्त होण्याचे साधन।

अन्य भाषाएँ

मी देवा कडे माझ्या पापांची क्षमा भेटण्यासाठी कसे मांगू ? जाणून घ्या पापातून मुक्त होण्याचे साधन।

क्षमा आणि माफ़ी

हे एक खरं विधान आहे की आयुष्यातील सर्वात कठीण गोष्ट म्हणजे एखाद्याने ज्याने आपणांस  दु: खी केले आहे त्याला क्षमा करणे। आणि जेव्हा आपण स्वतः चुका करतो तेव्हा आपण सुद्धा आशा करतो की दुसर्‍याने पण आपल्याला क्षमा करावे। आपण हे ऐकले आहे की क्षमा केल्याने आपले मन हलके होते परंतु क्षमा करन तेव्हाच संभव आहे जेव्हा क्षमा मागितली जाते। काही लोक क्षमा मागतच नाहीत किंवा त्यांना याची जाणीवही होत नाही आणि हे योग्य पण वाटत नाही।

जर आपल्याला हे समजले असेल की, आपल्या चुकांबद्दल आपल्याला लोकांन कडून क्षमा मागणे आवश्यक आहे। तर आपण हे नाकारू शकत नाही की आपल्या स्वतः च्या पापांन  साठी पण पवित्र देवा कढे क्षमा मागावी लागेल।

हमसे chat करें

आपण स्वत: ला देवासमोर पापी/अपराधी मानतो काय? तुम्ही तुमच्या पापांसाठी कधी देवाकडे माफी मागितली आहे का?

जर या दोन प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ असेल तर आज तुम्हाला या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत।

पाप म्हणजे काय?

पाप फक्त खून किंवा चोरी नाही तर एक असाध्य रोग आहे किंवा आपली नैसर्गिक वृत्ती आहे ज्यामुळे मनुष्याला देवा विरूद्ध प्रत्येक लहान-मोठी गोष्ट चूक करायला लावतो। आपण पाप केल्यामुळे दोषी होत नाही, तर आपण जन्मापासूनच पापी आहोत म्हणून आपण अपराध करतो। आपण सर्वजणा  ने पाप केले आहे आणि पवित्र देवा पासून दूर गेलो आहोत।

आपल्या जीवनात याचा परिणाम काय होत आहे?

  • सतत चुका करत असताना, स्वतःला दोषी ठरवतो आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी लढा देत रहातो।
  • आपल्या चुकीच्या कृती लपवण्यासाठी आपण नेहमीच चांगले काम करत असतो।
  • आपण वारंवार तीच पापे करातो  जी आपण करु इच्छित नाही, तरीही आपण ती पुन्हा – पुन्हा करतो।
  • देवा बरोबर आपल वैयक्तिक संबंध नाही  राहत।
  • इतर लोकांशी आपले संबंध तणावापूर्ण होतात।

पापांची क्षमा मिळवण्यासाठी आपण काय- काय करतो ?

आपल्यातील पुष्कळजण आपल्या पापांच्या क्षमा साठी चांगली कामे करतात, दान करतात. बरेच लोक त्यांच्या शरीरावर अत्याचार करून त्यांच्या पापांसाठी क्षमा मागतात। काही लोकांच असा विश्वास आहे की चांगली कामे केल्याने आपली सर्व पापं धुतली जातील। चांगल्या कर्मां मुळे पुढील आयुष्यात आपल्याला कमी दुःख सहन करावे लागेल। आपल्याला प्रत्येक जन्मात चांगले होण्याची संधी मिळेल आणि शेवटी आपण आपल्या सर्व पापांपासून मुक्त होऊ आणि आपण परिपूर्ण होऊ।

मंदिर, मस्जिद, चर्च किंवा गुरुद्वारामध्ये मेणबत्त्या जाळणे, प्रार्थना करणे, दुआ करणे, फुले अर्पण करणे, तीर्थ क्षेत्रात जाणे, गोरगरिबांना भोजन देणे अशा गोष्टी पापांच्या क्षमा साठी प्रत्येक धर्मात केल्या जातात। प्रत्येक धर्म पापाबद्दल सांगतो आणि प्रत्येकजण प्रयत्न करतो की त्यांना त्यांच्या पापांची क्षमा देवा कडून मिळावी आणि त्यांच्याशी मेळ होईल. याबद्दल काही प्रश्न आपल्या मनात असतील, जसे कि:

1. काय मी खरोखर स्वर्गात जाणार का?

2. काय मी खरोखर चांगल्या गोष्टी करत आहे का ? जे माझ्या सर्व वाईट कृती लपवतात?

3. काय मी माझ्या पाप करण्याच्या इच्छेवर विजय मिळवू शकलो आहे का? या मी पुन्हा दल-दल मध्ये अडकलो आहे?

काय मला माझ्या सर्व पापांची क्षमा मिळु शकते?

देवाचे वचन बायबल नुसार, आपण फक्त येशू ख्रिस्ताद्वारे देवा कडून आपल्या पापांची क्षमा भेटू शकते. त्यांच्याद्वारेच आपल्याला पापां पासून स्वातंत्र्य मिळते आणि मरणा नंतर स्वर्गात आपल्याला अनंत काळचे जीवन मिळते।

कारण पापाचा पगार म्हणजे आध्यात्मिक मृत्यू आहे किंवा देवा पासून विभक्त (वेगळे) होणे आहे। बायबल नुसार, देव आपल्यावर इतके प्रेम करतो की येशू ख्रिस्तला आपल्या पापांसाठी वधस्तंभावर मरण भेटले..  जेणेकरुन आम्ही व तुम्ही देवा जवळ जाऊ शकू।

 क्षमा मिळविण्यासाठी मला काय करावे लागेल?

देवाची क्षमा मिळविण्यासाठी आपणास त्याच्याकडे माफी मागावा लागेल आणि येशू ख्रिस्तला आपला तारणारा म्हणून स्वीकाराव लागेल।

आपणास येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवयला लागेल कारण

देव पिता आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्याला क्षमा हि करतो।

देवाचा पुत्र, प्रभु येशू ख्रिस्त, आपल्या पापांपासून मुक्त करतो।

देवाचा आत्मा आपल्याला पापाविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य देतो।

याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आणि आपल्या पापांची क्षमा मिळविण्यासाठी आपण आमच्याशी संपर्क साधू शकतात। या नवीन टप्प्यावर (एक नयी मंजिल) आमच्यात सामील व्हा!

हमसे chat करें
To Top