fbpx
हमसे जुड़ें

येशू ख्रिस्ताचे प्रेम पत्र

आप क्या सोच रहे हैं? जानिए अपनी सोचने की क्षमता और महत्व : Motivational

अन्य भाषाएँ

येशू ख्रिस्ताचे प्रेम पत्र

आपले प्रेम आपल्या साठी किती महत्वाचे आहे. आपण प्रेम कसे व्यक्त करतो प्रेम पत्रांद्वारे। किती सुंदर आणि प्रेमळ भावना आहे। अशाच प्रेमाला आपण ओळखतो जे बिना शर्त आहे, सत्य आहे आणि त्याने आपल जीवन त्यागलं, तुमच्या आणि माझ्यासाठी, त्याच्या प्रेमात चांगलेपणा आहे आणि चला तर त्याच्या प्रेमला जाणून द्या!

शब्दांसह कबुली जबाब, प्रेम व्यक्त करा!

बर्‍याचदा जेव्हा आपण ‘प्रेमपत्र’ सारखा एखादा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या मनात हे चित्र दिसून येते ज्यामध्ये एक प्रियकर आपल्या मैत्रिणीसाठी प्रेमात पत्र लिहितो आणि मैत्रीण देखील त्यास उत्तर म्हणून एक पत्र लिहिते आणि ती सामान्य गोष्ट आहे महत्त्वाचे म्हणजे आपण हे आपल्या आजूबाजूला, आपल्या आसपासच्या भागात, बॉलिवूड चित्रपटांमध्ये, कथांमध्ये … किंवा कदाचित आपल्या स्वतःच्या आयुष्यात देखील पाहिले आहे!

आता प्रेम पत्राच्या ऐवजी मेसेजेस आले आहेत … फोन इनबॉक्सवर किंवा व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबुकवर … पण आजही लोक त्यांच्या मनापासून व्यक्त करतात, त्यांच्या शब्दात लिहून मेसेजमध्ये किंवा कागदावर… 

हमसे chat करें

आमचे प्रेम

आपल्यातील प्रत्येकजण ला कधी – न – कधी प्रेम झालं आहे. ह्या गोष्टीचा आपण कधीही नाकार करू शकत नाही। हा काळ असा असतो जेव्हा आपण आपल्या प्रियकरास त्यांच्या वर आपण किती प्रेम करतो याबद्दल पूर्ण सत्य आणि निष्ठेने सांगतो। हे सांगताना आपण जेव्हा लिहितो तेव्हा आपण आपले लव्ज़ किंवा शब्द फार बारिकिने विचार करून निवडतो। आपल्याला आपला प्रियकर किती हवा आहे, त्याला लिहिताना आपण किती विचार करतो। आपल प्रेम आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे हे सांगण्यासाठी आपण जिवाच-प्राण करतो। आणि ही उचित गोष्ट आहे … शेवटी, ते माझे प्रेम आहे … मी तिच्यावर/त्याच्यावर प्रेम करतो. मी तिच्यासाठी / त्याच्यासाठी सुद्धा जीव देऊ शकतो… बरोबर कि नाही… !!!

देवाचे प्रेम

काही असच प्रेम देव आपल्यावर करतो। याची एक झलक आपल्याला बायबलमध्ये मिळते, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, “देवाने जगावर इतके प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळावे।”

या विधानातून हे स्पष्ट झाले आहे की देवावरील प्रीति अनंतकाळचे जीवन देते जी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्या द्वारे भेटते। देवाचे प्रेम आपल्याला नाश किंवा सत्यानाश यातून वाचवतो। हेच कारण आहे की देवाचे प्रेम हे आदर्श मानले जाते कारण कोणीही त्याच्यासारखे आपल्यावर प्रेम करू शकत नाही आणि बायबलला देवाचे किंवा येशू ख्रिस्ताचे प्रेम पत्र म्हटले गेले आहे…

काय सांगितले … देवाच्या प्रेम पत्रात?

होय … कारण बायबल आपल्याला देवाच्या प्रेमाविषयी सांगते। बायबलमध्ये अशा हजारो गोष्टी आहेत ज्या आपल्यावर येशू ख्रिस्ताच्या प्रेमाविषयी सांगतात। आणि हे प्रेम खरे आहे …

एकदा येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी त्याला विचारले की या जगात सर्वात मोठा कायदा किंवा नियम कोणता आहे की आपण त्याचे पालन केले पाहिजे … आणि येशूने फक्त दोन गोष्टी सांगितल्या ज्या प्रेमावर आधारित आहे –

पहिली… की आपण आपल्या अंतःकरणाने, मनाने, आत्म्याने आणि सामर्थ्याने आपल्या पित्या देवावर प्रेम कराव … आणि

दुसरी … की आपण आपल्या स्वतःसारखेच आपल्या शेजाऱ्यावरही प्रेम केले पाहिजे।

येशू ख्रिस्तानेच आपल्याला शत्रूंवरही प्रेम करण्यास शिकवले।

पण हे सर्व कसे शक्य आहे? तर प्रेमाची अशी कुठली व्याख्या आहे की जर आपल्याला माहित असेल तर आपण देखील खरे प्रेम करण्यासाठी शिकू शकतो?

एक आदर्श प्रेम किंवा खर प्रेम

बायबलमध्ये आपल्याला खऱ्या प्रेमाची व्याख्या आढळते. बायबल म्हणते – “प्रेम धैर्यशील आणि दयाळू आहे, प्रेम अभिमान बाळगू शकत नाही आणि बढाई मारत नाही, प्रेम चुकीच्या मार्गाने नाही चालत आणि फक्त स्वतःचे चांगले शोधत नाही, प्रेम चिडत नाही आणि वाईट मानून घेत नाही। प्रेम चुकीच्या कर्मांनी आनंदित नसते, परंतु सत्याने आनंदी असते। प्रेम सर्व गोष्टी सहन करतो, सर्व गोष्टी स्वीकारतो, सर्व गोष्टींची आशा ठेवतो, सर्व गोष्टींमध्ये धीर धरतो।”

देव बायबलमध्ये पुढे म्हणतो, “… विश्वास, आशा आणि प्रेम हे तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्या सर्वांत श्रेष्ठ म्हणजे प्रेम।”

म्हणूनच बायबलला येशू ख्रिस्ताचे प्रेम पत्र म्हटले गेले आहे, जे एक ऐतिहासिक प्रेम पत्र आहे ज्याला वाचून लोकांचे जीवन बदलले आणि लोकांना खऱ्या प्रेमाविषयी कळले आहे। आणि येशू ख्रिस्ताने केवळ आम्हाला एक प्रेम पत्र लिहिले नाही, तर त्याने आपल्यासाठी त्याचे जीवनही बलिदान केले। असे प्रेम या जगाच्या इतिहासात आमच्यावर कोणीही केले नाही।

तुम्हालाही हे प्रेमपत्र वाचून येशू ख्रिस्ताच्या खऱ्या प्रेमा विषयी जाणून घ्यायचे असेल तर आमच्यात सामील व्हा।

हमसे chat करें

आगे पढ़ना जारी रखें
आप इन्हे भी पढ़ना पसंद करेंगे ...
To Top